पेज

२० मे, २०२१

So called एकता, बंधुता, समता


         माणसाच्या जिवन जगण्याच्या ना खूप वेगवेगळ्या तऱ्हा आहेत. कुणी इतरांसाठी जगतो, कुणी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी. काही जण अगदी निखळ, निस्वार्थी भावनेने, आत्मिक समाधानाने समाजाच्या दृष्टीने आयडियल असे जीवन जगत असतात. पुण्यातील "Z bridge" नावाच्या 'पुलाखाली' मात्र काही लोक असे आहेत, जे मृत्यू माणसाच्या हातात नाही... आणि जन्म तर त्याहून नाही. आणि पदरी पडलेल्या दुर्दैवी जगण्याला दुसरा नाही म्हणून कुढत कुढत जीवन जगतात.
         बघा ना नियतीची करणी..., त्याच bridge "वर" आपल्या प्रेमाची फक्त चैन पूर्ण करण्यासाठी पैसे उधळणारे प्रेमी युगुल आहे, तर "खाली" या पैशासाठी आपल्या माईचा प्रेमळ पदर सोडून त्याच पैशासाठी दिवसरात्र वणवण आहे. किती हा विरोधाभास ना !
         या लोकांना पाहिलं की, प्रश्न पडतो यांना जीवनाचा अर्थ माहिती आहे का? आपण स्वप्नांशिवाय जीवन जगू शकत नाही. पण इथे स्वप्न म्हणजे काय तेच माहित नाही. आपल्याकडे बाळ बोलायला लागल्यावर त्याला आई, वडिल, आजी आजोबा बोलायला शिकवले जाते. मात्र इथे 10 वर्षांच्या मुलाला त्याच्या जन्मदात्याच नाव ही माहिती नाही !
        एक फार गमतीची गोष्ट जाणवली, त्यांची नावं राम, लक्ष्मण, हनुमान, सरस्वती, सीता अशी आहेत. जणू (गरीब) देवांची पंढरीच ती...! पण त्यांना कोण सांगणार ना, की, या जगात देवाच्या केवळ नावाने देववैभव प्राप्त होत नाही... पोटाची खळगी भरण्यासाठी जेव्हा 3-4 दिवसांच बाळ टाकून आईला कामावर जावे लागते, तेव्हा विश्वास दृढ व्हायला लागतो की 'देव' वगैरे सगळ अंधश्रद्धा आहे.
        11-12 वर्षाच्या मुलींना काय कळणार लग्न....? कसला करणार त्या संसार....? पण इथे अस्संच होतं. नाचण्या-बागडण्याच, भातुकली खेळण्याचं तींच वय... बाहुलीचं लग्न लावता लावता ती स्वतः च बाहुली होऊन जाते. आणि... बाहुलीचा चुल आणि मुलांचा संसार कधी तिचा होऊन जातो तिलाही कळत नाही... यांना प्रश्न विचारला तुम्हाला शिक्षण घ्यावसं नाही वाटत का? ते म्हणतात शिकताना काय पैसा मिळतो काय! हे उत्तर म्हणजे मला तर, कोणत्या ही सुशिक्षित भारतीयाला अक्षरश: शालजोडे मारल्यासारखे वाटते!
        यांना एवढचं माहिती आहे की आपल्याला भूक लागते, भूक लागल्यावर दोन घासांसाठी सुद्धा पैसाच लागतो!!! मात्र तो  मिळवण्यासाठी माध्यम निवडण्याचा पर्याय यांच्याकडे नाही. मिळेल ते काम करून 10-20 रूपयांसाठी झगडणे हेच त्यांचं आयुष्य. इथल्या भाबड्या लहानग्यांना आपल्याला 2000 रुपयांची नोट फक्त पाहायला मिळू शकते या नुसत्या कल्पनेनेच बावरायला होतं. आपण ज्या संस्कृतीच्या उपासक, विकसनशील, शिस्तप्रिय देशाचं गुणगाण गात जगभर मिरवतो ना... तो स्वतःचा देश "भारत"/ "India" देखील यांना माहित नाही, यापेक्षा दुसरे दुर्दैव ते काय...!
       जर भारत सुधारला म्हणजे प्रगतशील झाला असं वाटल ना, तर अर्धा तास Z bridge खाली येऊन बसायचं, वास्तवाची जाण होईल.
        खरचं, भारतातील दारिद्रय, उपासमार, कुपोषण, बालविवाह या एक ना अनेक समस्यांचं हुबेहूब चित्र इथं रेखाटलं आहे. Z bridge "वरून" बऱ्याचदा गेले असाल, एकदा खाली चक्कर टाका म्हणजे so called विकसनशील भारताचं खरं रूप पाहून डोळयांत क्षणभर का होईना पाणी तरळेल, अर्थातच संवेदनशील असाल तर!
        असो, हा झाला पुण्यातील डेक्कन शेजारचा 1 Z bridge. असे भारतात किती Z bridge आणि किती अशी लोक आहेत कोण जाणे?
        त्यांना दिवाळीचा फराळ, फटाके, चॉकलेट्स, ब्लॅकेट्स, कपडे देवून..., सहानुभूती देवून...दुबळा भारत बनवण्यापेक्षा, प्रत्येकाने एकाला एक तरी स्वप्न, इच्छा, आशेचा किरण दिला पाहिजे. तर कुठेतरी भारताची बंधुता, एकता, समता ही 'फक्त सांविधानिक' तत्त्वे अस्तित्त्वात यायला लागतील !!!

१६ टिप्पण्या:

  1. Sglya goshti far sundr pddhtine mandle tu. Z bridge vr ani khali kiti virodhabhas ahe, he tyatun smjtech pn tyachbrobr bharat ani India mdhye tyahun jast ahe he hi titkech janvte

    उत्तर द्याहटवा
  2. झेड ब्रिज चा उल्लेख जरी केला तर काहींना ती प्रेमाची निशाणी वाटते परंतु झेड ब्रिज खालील काळा अंधार पाहिल्यास मन हेलावून जातं...हृदयद्रावक स्थितीचे उत्तम वर्णन केलेस तू अक्षता👌

    उत्तर द्याहटवा
  3. जे सत्य खूप कमी लोक पाहतात आणि त्याची जाण ठेवून वागतात त्या सत्याची तू आज ओळख करून दिलीस...बाहेरून सुंदर दिसणाऱ्या जगात आत डोकावून पाहिलं तरच हे विदारक दृश्य पाहायला भेटलं....खूप छान अक्षता अभिनंदन..!!

    उत्तर द्याहटवा
  4. सर्व गोष्टी दिसतात समजाला परंतु मला नाही वाटत भारतीय समाज हा विचाराने पंगु झालाय, आपल्याला फक्त जे पाहिजे तेच पाहायचं आहे. छान लिहिलं आहेस ⭐

    उत्तर द्याहटवा
  5. मला नाही वाटत काही चांगलं होईल असं पण !

    उत्तर द्याहटवा

इस्राईल- Palestine

      हिटलरने ज्यू धर्मीयांचा कसा छळ केला, घृणास्पद वागणूक दिली  हे आपण जाणतो. मात्र ज्यूंविषयी हे अत्याचार वर्षानुवर्षांपासून  चालत आलेत. म...

Most viewed